Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

होणार होळी...परळीमध्ये पत्रकारांची निदर्शने व कुचकामी, पत्रकार संरक्षण धोरणाची होळी

 आपला ई पेपर |परळी|


पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवार 17 ऑगस्ट 23 रोजी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या 11 पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आल्यामुळे...


 परळी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने उद्या 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात उपस्थित राहून निदर्शने करत पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्यात येणार आहे. व त्या नंतर सर्वांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. या प्रसंगी परळी शहर व तालुक्यातील सर्व संपादक, पत्रकारांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही करत आहोत.



विनीत


*मराठी पत्रकार परिषद, शाखा परळी*

*मराठी पत्रकार संघ परळी*

*डिजिटल मीडिया परिषद, शाखा परळी*

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ शाखा परळी*

*तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद शाखा परळी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या