Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भगवान विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी


येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या भगवान प्राथमिक शाळेत देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८वाजता संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री कराड व शाळेचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व,स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक वीरांचे महत्त्व व मिळालेले स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी देशातील विद्यार्थी, युवक व नागरिक यांचे आवश्यक योगदान व भुमिका विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री कराड, शिवाजी अघाव, डावरे, प्रभाकर फड आदी उपस्थित होते.  

प्रथम सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यातआला.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीते व भाषणांचा कार्यक्रम घेण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे भाषण कलागुण पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक सुनील चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश विभूते यांनी मानले. 

देशाच्या अमृत मोहत्सवा निमित्त तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या