Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत निषेध ! लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांवर हल्‍ले वाढत आहेत.. त्‍या निषेधार्थ


 पत्रकारांवर हल्‍ले वाढत आहेत.. निषेध 

आपला ई पेपर | parli|

परळीत पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच आहेत. एका जबाबदार लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ  सर्व पत्रकार वतीने दि.17 ऑगस्‍ट रोजी दुपारी 11 वाजता 


परळीतील मध्यवर्ती भागात असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने करण्यात आले. यावेळी पत्रकार संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून संरक्षण हा महत्त्वपूर्ण मुद्दा असून पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्याचे संरक्षण झालेच पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या परळीत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी


पत्रकारावर हल्ले होऊन जर गुन्हे दाखल होत नसतील तर त्या कायद्याचा काय उपयोग? पत्रकारांच्या संतप्त प्रतिक्रिया

पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्थ परळी येथे सर्व पत्रकार संघटना, संपादक यांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्याच्या शासन आदेशाची होळी राणी लक्ष्मीबाई टावर येथे केली. दि 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. परळी शहर व तालुक्यातील संपादक व पत्रकार बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे  पत्रकारांवर हल्ले झाले. त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे.पत्रकारावर हल्ले होऊन जर त्या कायद्याखाली गुन्हा दाखल होत नसेल किंवा त्याची कडक अंमलबजावणी होत नसेल तर तो कायदा काय कामाचा? अशा संतप्त प्रतिक्रिया परळी येथील आंदोलनात पत्रकार बांधवांनी व्यक्त केल्या. पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, हल्लेखोरावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत. पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार अंगार है...अशा घोषणांनी राणी लक्ष्मीबाई टावर परिसर दणाणला होता. या प्रसंगी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून उपजिल्हाधिकारी कार्यालय परळी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.


निवेदनावर निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी, डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका सचिव दीपक गिते, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे दशरथ रोडे, तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे अमोल सूर्यवंशी,

संपादक प्रकाश सूर्यकर, राजेश साबणे, शिवशंकर झाडे, आत्मलिंग शेटे, ज्ञानोबा सुरवसे, रानबा गायकवाड, बालकिशन सोनी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर, ओमप्रकाश बुरांडे, पत्रकार धनंजय आरबुने, जगदीश शिंदे, भगवान साकसमुद्रे, धीरज जंगले, माणिक कोकाटे, प्रा.प्रवीण फुटके, प्रकाश चव्हाण, गणेश आदोडे, पद्माकर उखळीकर, सय्यद अफसर, सचिन मुंडे, शेख मुकरम, बाबा शेख, संदीप मस्के संतोष बारटक्के आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या