Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड येथे होणाऱ्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे |संगिताताई तूपसागर

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


बीड येथील छत्रपती संभाजी महाराज. क्रिडांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल भाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री ना धनंजय मुंडे, महिला आयोगाचे अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्य मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत दि 27 तारखेला जाहीर सभा संपन्न होणार आहे. 


या सभेस बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव संगिताताई तूपसाकर यांनी केले आहे.


    बीड शहरातील सनराईज हॉटेल येथे या सभेच्या नियोजनार्थ नुकतीच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाला होता. सभेच्या अनुषंगाने ठेवलेल्या बैठकीला आ.प्रकाश दादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब काका आजबे, विजयसिंह पंडित, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, कल्याणराव आखाडे, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्‍वर चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऍड. प्रजाताई खोसरे, अशोकराव डक, राजकिशोर पापा मोदी, दत्ता पाटील, जयसिंह सोळंके, शिवाजी राऊत, माधवराव निर्मळ, बबन गवते, रामकृष्ण बांगर, दशरथ वनवे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर, 


परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, बाजीराव धर्माधिकारी, विलास सोनवणे, नारायण शिंदे, अविनाश नाईकवाडे, महादेव धांडे, सतीश शिंदे, विष्णूपंत सोळंके यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बीड येथे रविवार दिनांक 27 रोजी होणाऱ्या या विराट सभेला बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव संगिताताई तूपसागर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या