आपला ई पेपर अंबाजोगाई |प्रतिनिधी
दारू पिऊन मुलास शिवीगाळ करत बायकोला घालून-पाडून बोलत असल्याचा राग आल्याने मुलाकडूनच बापाचे कु-हाडीने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे घडली.या प्रकरणी मयताच्या पत्नीनेच आपल्या अल्पवयीन मुलाविरोधात बर्दापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील पूस या ठिकाणी
साहेब जानुखॉ पठाण (वय 47) हे आपल्या परिवारासह पूस शिवारात शेतात आखाड्यात राहत असून दि 17 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास साहेब जानुखॉ पठाण हे दारू पिऊन येऊन पत्नी शमीमबी साहेब पठाण हिस घालून-पाडून बोलत त्यांचा 17 वर्षीय मुलगा तौहीत साहेब पठाण यास शिवीगाळ करून मारहाण करीत असताना तौहित पठाण यास बापाचा राग आल्याने घरातील कु-हाडीने साहेब जानुखॉ पठाण यांच्या डोक्यात, कपाळावर, चेह-यावर मारून गंभीर जखमी करून ठार मारले.
ही घटना मध्यरात्रीच्या 1च्या दरम्यान घडली.
या प्रकरणी मयताची पत्नी शमीमबी साहेब पठाण यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन 127/2023 कलम 302 भादवी नुसार त्याचाच अल्पवयीन मुलगा तौहीत साहेब पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास ठाण्याचे सपोनि ठाकूर हे करीत आहेत.

Social Plugin