Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय संकुलात भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी


स्वातंत्र्य दिनाचे ओेैचित्य व हर घर तिरंगा अंतर्गत मंगळवार दि 15 ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी देशाचा स्वतंत्र दिन मोठया हर्ष उल्हासात परळी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय संकुलात साजरा करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख,सुदाम शिंदे,सखाराम शिंदे,गावचे सरपंच यांच्यासह ग्रामीण बँक,आरोग्य केंद्र,सेवा सोसायटी यांचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी,गावातील तरुण आदी सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्या मध्ये वक्तृत्व, देशभक्तीपर गीतांचे गायन, सामुहिक नृत्य रंगमंचावर सादर केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सृजनात्मक विकासाला चालना देणाऱ्या टॉय बँक उपक्रमांतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक खेळणी उपस्थित मान्यवर व पालकांच्या हस्ते शाळांना सुपूर्द करण्यात आल्या.

या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख अंगद पेड्डेवाद,प्रास्तविक बालाजी कडभाने तर आभार सुनील शिंदे यांनी केले.मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाचे सुनील तारे, हनुमंत वाघमोडे,सुरेंद्र हरदास यांच्यासह इतर सर्व सहकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या