Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी-गंगाखेड आगारामुळे 800 विद्यार्थीनींच्या शिक्षणावर परिणाम,अवैध वाहतुकीचा घ्यावा लागतो आधार..

परळी- गंगाखेड महामार्गावरील 10 गावांसाठी बसच नाही..


आपला ई पेपर 

परळी-गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर व आजुबाजुस असलेल्या 10 गावासाठी एस टी महामंडळाची एकाही बसचा थांबा नसल्याने परळी व गंगाखेड येथे शाळा,महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 800 विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम होत असुन या मार्गावरील ग्रामपंचायत व परळीतील महाविद्यालयाने पत्र,निवेदन देवुनही परळी किंवा गंगाखेड आगारातुन या विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्यात आलेली नाही.

 परळी ते गंगाखेड हा 35 कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग असुन या मार्गावर परळी,सोनपेठ व गंगाखेड या तिन्ही तालुक्यातील 10 गावे येतात.या दहा गावांची लोकसंख्या 70 हजारच्या जवळपास आहे.परळी व गंगाखेड या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी या गावातील विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत

परळी- गंगाखेड महामार्गावर परभणी-लातुर,नांदेड,बीड,

अंबाजोगाई यासह मराठवाडा व विदर्भातील अनेक आगारांच्या दिवसभरात किमान 100 बसेस धावतात परंतु या मार्गावरील कुठल्याच थांब्यावर एकही बस थांबत नाही.यामुळे या दहा गावातील विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयात प्रवेश असतानाही शिक्षण घेता येत नाही.


राज्य शासनाने विद्यार्थीनींना मोफत बसेसची घोषणा केली असली तरी या मार्गावर शेकडो बसेस असताना ही योजना कागदावरच आहे.परळी शहरातील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाने परळी आगार व विभागीय नियंत्रकांशी पत्रव्यवहार करुन विद्यार्थीनींसाठी बसेसची व्यवस्था करण्याची मागणी व निळा गावच्या ग्रामस्थांनी गंगाखेड आगारास निवेदन देवुन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही शाळा,महाविद्यालये सुरु होवुन दोन महिने उलटले तरी सर्व थांबा असलेली बससेवा किंवा आहेत त्या बसेसला थांबा देण्यात आलेला नाही. 


@@@@@

दहा गावांना दहा वर्षापासुन एकही बस नाही

परळी- गंगाखेड मार्गावरील दादाहरी वडगाव,दगडवाडी,उक्कडगाव,उखळी,करम,निळा,वडगाव स्टेशन,वैतागवाडी,बनपिंपळा,पडेगाव या दहा गावासाठी मागील दहा वर्षापासुन सर्वथांबा असलेली एकही बस नसल्याने सर्व वाहतुक अवैध वाहनातून होत आहे.


 @@@@@


निवेदन देवुनही बस सुरु नाही

 परळी गंगाखेड मार्गावर दर एक तासाला सर्वथांबा बससेवा सुरु करावी किंवा परळी व गंगाखेड आगाराच्या सर्व बसेसला थांबे द्यावेत यासाठी गंगाखेड आगार यांना निवेदन देवुन आंदोलनाचा इशारा दिला होता.अद्यापही बससेवा सुरु झालेली नसल्याने निळा येथे फक्त बसेसचा रास्तारोको करणार आहोत.

 - प्रल्हाद आढाव,

उपसरपंच,निळा,ता.सोनपेठ 

@@@@@@

 बस नसल्याने शिक्षण बंद होत आहे 

 निळा या गावातुन आम्ही 40 मुली व इतर विद्यार्थी गंगाखेड येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी जातो.परंतु बसेसची व्यवस्था नसल्याने पालक ॲटो अथवा इतर वाहनातून जाण्यास परवानगी देत नसल्याने शिक्षण घेता येत नाही.आम्हाला महाविद्यालयात  जाण्याच्या व येण्याच्या वेळेत बस उपलब्ध करुन द्यावी.

- नंदिनी संभाजी आढाव

विद्यार्थीनी,निळा.

@@@@@@

बस नसल्याने अवैध वाहतुकीस चालना

परळी-गंगाखेड महामार्गावर एकही सर्वथांबा बस नसल्याने या मार्गावरील गावातील प्रवाशांना अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.राज्य शासनाने महिलांसाठी 50% सवलत तसेच जेष्ठ नागरीकांना बसच नसल्याने या योजनेचा लाभ घेता येत नाही.राज्य परिवहन महामंडळाची बस पोंहचलेली असताना राष्ट्रीय महामार्गावरुन बस गायब झाल्याने ग्रामीण भाग अवैध वाहतुकीकडे वळण्यास परळी व गंगाखेड आगार कारणीभुत ठरत असल्याने संताप व्यक्त होत आहे


सौजन्य दैनिक दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी 

धनंजय आढाव 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या