Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

केवळ पत्रकार नव्हे तर उत्कृष्ट सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदन आणि मान्यवरांनाचा गौरव करायचा तर त्याचे स्मरणपत्र हे प्रशांतनेच लिहिलेले असायचे..

केवळ पत्रकार नव्हे तर उत्कृष्ट सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदन आणि मान्यवरांनाचा गौरव करायचा तर त्याचे स्मरणपत्र हे प्रशांतनेच लिहिलेले असायचे..


हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया

एकच नाव आणि सारखेच आडनाव असलेली अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळू शकतात , मात्र नाव , आडनाव सारखेच.... एकच गाव एकच व्यवसाय आणि सोबतच काम असा योग मात्र क्वचितच पाहायला मिळतो ..... असाच अनोखा योगायोग असलेला माझा नाव आणि आडनाव बंधू प्रशांत जोशी गेल्याची बातमी पहाटे समजली आणि मन हेलावून गेले......

परळीच्या सर्वात प्रतिष्ठित दैनिक मराठवाडा साथीचा कार्यकारी संपादक असलेला प्रशांत प्रभाकर जोशी हा तसा मूळ अंबाजोगाईचा असला तरी मागील तीस वर्षात परळीत आला इथे स्थायिक झाला आणि परळीचा होऊनच गेला... 

तो केवळ पत्रकार नव्हता तर तो उत्कृष्ट सूत्रसंचालन करायचा,  उत्कृष्ट निवेदन करायचा आणि शहरातल्या कोणत्याही मान्यवरांना गौरव करायचा असेल तर त्याचे स्मरणपत्र हे प्रशांतनेच लिहिलेले असायचे....

दैनिकातील जबाबदारी पार पाडण्या सोबतच तो स्वतःची दरवर्षी न चुकता दिनदर्शिका ही काढायचा.... मोबाईल येण्याच्या पूर्वी त्यांनी काढलेली दूरध्वनी पुस्तिकाही परळीकरांच्या आजही चांगली स्मरणात असेल..... पत्रकार असला तरी जाहिरातीचा मागे तो कधीच धावला नाही.... 

 तो सामाजिक कार्यातही सक्रिय असायचा रोटरीच्या प्रत्येक व्यासपीठावर प्रशांत आणि त्याचा तो आवाज दिसायचा....  मराठवाडा साथीच्या प्रत्येक कार्यक्रमातील त्याचा आवाज परळीकरांना अगदी सुपरीचीत होऊन गेला होता...

अंबाजोगाईतून पत्रकारिता सुरू करताना नंतरच्या काळात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासोबत काही काळ स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले.... दैनिक सोमेश्वर एक्सप्रेस चा संस्थापक .... कार्यकारी संपादक ते या दैनिकाची उभारणी आणि शासन मान्यता मिळवून देण्यापर्यंत त्याचा सिंहाचा वाटा होता.....

 कालांतराने हे दैनिक बंद पडल्यानंतर त्यांनी मराठवाडा साथीची जबाबदारी अगदी शेवटपर्यंत आपल्या खांद्यावर पार पाडली.... मागील काळात मराठवाडा साथीलाही अनेक अडचणी भेडसावत असताना या अडचणीच्या काळातही आपल्या संस्थेला सोडता आहे त्या परिस्थितीत खंबीरपणे प्रशांतने काम केले.... 

परळीच्या छोट्या छोट्या अडचणी , समस्या बाबत तो खूप हळवा होता, प्रशांत बघारे काहीतरी करा रे असे सांगताना त्याचे मन व्याकूळ होऊन जायचे....

सोमेश्वर एक्सप्रेस आणि नंतर काही काळ मराठवाडा साथी मध्ये सोबत काही काळ काम केले... अनेकदा सारख्याच नाव आणि आडनाव यामुळे घोळ व्हायचा...  माझे फोन त्याला जायचे आणि त्याचे पण मला यायचे.... अगदी २ दिवसापूर्वी असाच एक फोन आला होता...

हा घोळ होऊ नये म्हणून अनेकांनी छोटा प्रशांत आणि मोठा प्रशांत अशी नावे ठेवली आणि मी छोटा होऊन गेलो... 

बातमी लिहिताना एकाचे श्रेय दुसऱ्याला जाऊ नये म्हणून तो प्रशांत प्र. जोशी लिहायला लागायचा आणि मी प्रभा जोशी या नावाने लेखन करायचो.... 

मनात अनेक दुःख अडचणी साठलेले असले तरी चेहऱ्यावर न दिसू देता तो धूरांच्या मागे तो त्याला लपवून ठेवायचा.... हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया.... गाण्या सारखे.... 

काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात सोबत बसून जेवण केले आपण एकाच नावाचे आडनावाचे आपले फोटो नाही म्हणून जेवणानंतर एकत्र फोटो काढायचे ठरले आणि कामाच्या गडबडीत दोघेही विसरून गेलो....

काल प्रशांत सिरीयस असल्याची बातमी समजली....  तातडीने लातूरच्या रुग्णालयात बोललो त्याला मुंबईला शिफ्ट करण्याचे ठरले ... मुंबईत अनेक हॉस्पिटलला बोलून उपचाराची तयारी केली होती मात्र नियती च्या मनात काहीतरी वेगळेच करायचे होते ... पहाट वेगळी बातमी घेवून आली....

तुला श्रद्धांजली तरी कशी वाहू..... मनात असंख्य आठवणी दाटल्या आहेत.... तुझा चेहरा समोरून जात नाही....

तू कायम आमच्या मनात राहशील.... आमच्या आठवणीत राहशील....

#भावपूर्ण_श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या