Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एक सही संतापाची’ आंदोलनाला परळी वैजनाथमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आपला ई पेपरपरळी वै


 राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या ‘एक सही संतापाची’ आंदोलनाला परळी वैजनाथ येथील नागरिकांकडून रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

मनसेने उभारलेल्या फलकावर सह्या करून


नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत राजकारण्यांचा निषेध केला.राज्यात गेल्या काही महिन्यांपासून फोडाफोडीच्या
राजकारणाला ऊत आला आहे. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार रातोरात पक्ष बदलू लागले आहेत.त्यामुळे विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी स्थिती मतदारांची झाली आहे.


मनसेच्या या आगळयावेगळय़ा आंदोलनास राज्यभरात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात मोठे फलक उभारण्यात आले होते. मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, गणेश राठोड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे,हानुमान सातपुते,राहुल गायकवाड,आकाश माने,शुभम मुंडे आदींच्या उपस्थितीत या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. ‘एक सही संतापाची’ ही मनसेची नाही तर लोकांची मोहीम असून लोकांना त्यांचा राग व्यक्त करण्याची संधी मनसेने उपलब्ध करून दिल्याचे परळीशहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या