Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न


आई,वडीलांचा विश्वास कधी तोडू नका..प्राचार्य अतुल दुबे

भारतीय संस्कृतीचे पालन करा..अँड अरुण पाठक

आपला ई पेपरपरळी 


         येथील तेली समाजाच्या वतीने १० व १२ तसेच समाजात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि.०९) करण्यात आले. कार्यक्रमास समाजबांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

           येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री. शनी मंदिराच्या सभागृहात श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, श्री शनैश्वर प्रतिष्ठान, तेली युवक संघटना, शनैश्वर महिला मंडळ, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १० व १२ तसेच समाजात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी दुपारी ११ वाजता करण्यात आले. 

कार्यक्रमास प्राचार्य अतुल दुबे, अँड अरुण पाठक, माजी नगरसेविका उमा समशेट्टी, विठ्ठल अप्पा चौधरी, वसंत फुटके, महाराष्ट्र प्रांतिकचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रघुनाथ भाग्यवंत, व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर, महारुद्र उदगीरकर, छगनप्पा क्षीरसागर, वैजनाथ कोल्हे, राधाताई फकिरे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शारदा बेंडे, सिमा क्षीरसागर, छाया लासे,वसंत फुटके, अँड अरुण पाठक, प्राचार्य दुबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य दुबे यांनी सांगितले की, आई,वडीलांचा विश्वास कधी तोडू नका, वडीलांना कोणासमोर मान खाली घालावी लागेल असे कृत्य करु नका. आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण करा, यशस्वी व्हा.तर अँड अरुण पाठक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. कितीही शिक्षण पूर्ण केले तरी भारतीय संस्कृती विसरु नका, समाजात अनेक अनिष्ट प्रथा आहेत. 

यापासून दुर राहून आत्मविश्वासाने अभ्यास करा.यानंतर समाजातील १० वी १२ मध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी, पालकांसह प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. १० वी १२ वी मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना नागनाथ सोनटक्के यांच्या वतीने नगदी रोख १५०० व १००० रुपये बक्षीस देण्यात आले. रुपेर (पंजाब) आयआयटी मधून पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या, आँस्ट्रोलिया विद्यापीठाची फेलोशिप मिळवलेल्या श्रुती शांतलिंग फुटके व पालकांचा गौरव तसेच डॉ पुष्कराज गौरकर यांचा सत्कार करण्यात आला.

सुत्रसंचालन प्रा.प्रविण फुटके, प्रास्ताविक उत्तम साखरे, आभार चंद्रशेखर फुटके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, समाजबांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेली समाजातील युवकांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या