Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत वीरशैव समाजाच्या वतीने जगद्गुरूंची शहरातून स्वागत रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

आपला ई पेपर |parli |


परळी शहरात श्री श्री श्री 1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल पीठ  यांचे गुरुवारी आगमन झाले. वीरशैव  समाज परळीच्या वतीने काढलेल्या रॅली दरम्यान कार वर ठीक ठिकाणी भक्तानी पुष्पवृष्टी करीत जगद्गुरु महास्वामीजींचे मनःपूर्वक स्वागत केले.

श्रीशैल्य जगद्गुरू व शिवाचार्य यांनी प्रभू श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.अभिषेक व पूजा केली. यावेळी त्यांचे श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले.

जगद्गुरू यांच्या उपस्थितीत ईष्टलिंग महापूजा व तीन दिवसीय अनुष्ठानचे परळीत आयोजन करण्यात आले आहे.त्या निमित्त वीरशैव समाजाच्या वतीने  20 जुलै रोजी स्वागत रॅली काढून  जगद्गुरु यांचे स्वागत करण्यात आले आहे.गुरुवार दिनांक 20 जुलै येथील हालगे गार्डन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली ,जगद्गुरू यांचे आशीर्वाचन झाले, परळीत जोरदार स्वागताने आपण भारावून गेलो आहोत,असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई कर यांनी आधिकामासाचे महत्व विशद केले .यावेळी नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज ,  माजलगावकर ,अमृतेश्वरशिवाचार्य महाराज जिंतूरकर,चंद्रशेखर शिवाचार्य महाराज,चन्नबस्वेश्वर शिवाचार्य महाराज बर्दापूरकर महाराज  उपस्थित होते .येथील हालगे गार्डन मध्ये  अनुष्ठान सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवस श्रीशैल पिठाच्या जगद्गुरूंच्या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे,

 दि. 22 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 वाजता  ईष्टलिंग महापूजा व दाम्पत्य पूजा होणार आहे .  1  पर्यन्त धर्मोपदेश  व नंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे .20 जुलै रोजी सायंकाळी शहरातील इटके कॉर्नर येथे श्रीशैल जगद्गुरूंचे स्वागत करण्यात आले व वीरशैव समाजाच्या वतीने जगद्गुरूंची परळी शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली आहे, मोटार सायकल रॅली  इटके कॉर्नर चौक ,एकमिनार चौक ,स्टेशन रोड राणी लक्ष्मीबाई टावर, गणेशपार मार्गे  हालगे  गार्डन पर्यंत काढण्यात आली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या