Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

CMB दरपत्रक न लावणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा |चंदुलाल बियाणी

 


वेळ जाण्याआधी योग्य उपाय योजना व्हाव्यात

मुंबई / वृत्तसंस्था-

बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मात्र अनेक रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे थेट रुग्णालयातून सुटी होतानाच जनरल रूम, स्पेशल रुमसह विविध सेवांचे दर समोर येतात. त्यातून अनेकदा वादही होतात. त्यामुळे दरपत्रक न लावणाऱ्या खासगी रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आरोग्य - मित्र महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


म्हणून सर्वच खासगी रुग्णालयांना त्यांच्या आवारात दर्शनी भागात उपचार व सेवेचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी हे दरपत्रक लावण्यात आलेले आहे. मात्र, बहुतांश रुग्णालये दरपत्रक लावण्यापासून दूरच आहेत. त्याकडे आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.


अनेक रुग्णालयात बंधनकारक आहे म्हणून अगदी छोट्या आकारात दरपत्रक लावण्यात आलेले आहेत. जवळ जाऊनच त्यावरील दर पाहावे लागतात. त्यामुळे अशा रुग्णालयांवरही कारवाई झाली पाहीजे. रुग्णांच्या नातेवाइकांना बिल देताच काउंटरवर जाऊन पैशांचा भरणा करतात. प्रत्यक्षात दर किती आहेत आणि किती आकारले, याची अनेक जण पडताळणीच करत नाहीत, असे न करता अनेकदा रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांनीही दरपत्रकाची उपचाराचे अधिक बिल घेतल्याच्या तक्रारी शहानिशा करावी, असे अवाहनही चंदुलाल ऐकायला मिळत आहेत. यावर प्रतिबंध बियाणी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या