Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नि:शब्द...

 नि:शब्द


"सर, बातम्या लवकर पाठवा.... जमलेच तर आजची मुख्य बातमी तुम्हीच करा....." दररोज संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोबाईलची रिंग वाजायची आणि प्रशांत जोशी यांचा आवाज कानी पडायचा..... गेल्या कमीत कमी पंधरा वर्षांपासून आम्ही सोबत काम करत होतो. 

आज तो प्रशांत जोशींचा आवाज अचानक बंद झाला..... 28 जुलै रोजी आमचे मोबाईलवर बोलणे झाले. नेहमीप्रमाणे 29 जुलै रोजी मी प्रशांत जोशी यांना फोन लावला. मात्र आवाज वहिनींचा आला.... हुंदके देतच त्यांनी सांगितले की,"त्यांची तब्येत थोडी जास्तच बिघडली आहे. आणि त्यांना उपचारासाठी लातूरहून मुंबईकडे नेत आहोत. फोन बंद झाला आणि मन अस्वस्थ झाले..... पहाटे पाच वाजताच मोबाईल वाजला.... आणि बाळासाहेब कडबाने यांनी सांगितले, "जोशीसाहेब आपल्याला सोडून गेले!"...... हे ऐकताच डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या..... झोपलेली बायको सुद्धा उठली आणि विचारले, अहो काय झाले! मी तिला रात्रीच सांगितले होते, "प्रशांत जोशी यांची तब्येत जास्त खालावली आहे असे वहिनींनी सांगितले आहे." तिने मला कसेतरी सावरले.... त्यानंतर कोणत्या गोष्टींमध्ये मनच लागेना... आता लगेचच प्रशांत जोशी यांना भेटायला जावे असे वाटत होते.

अत्यंत शांत, संयमी, हुशार, वक्तृत्ववान अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या वडील बंधूला गमावल्याचे दुःख जाणवू लागले होते. गेल्या पंधरा वर्षात एकत्र काम करून देखील कधीही आमच्या दोघात भांडणे झाले नाहीत. अत्यंत व्यक्तीप्रिय असलेले प्रशांत जोशी आज आपल्याला सोडून गेले. म्हणतात ना!, "जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला" अगदी असंच काहीसे प्रशांत जोशी यांच्या बाबतीत झाले. विशेष म्हणजे त्यांची अंत्ययात्रा 

निघताना आज सकाळपासून कोरडे असलेले आकाश देखील पावसाच्या सरींच्या रूपाने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पृथ्वीवर आले. आणि अंत्यविधी संपताच पावसाच्या सरी बंद झाल्या. एक प्रकारे त्या परमात्म्यानेच प्रशांत जोशी यांच्या स्वागतासाठी पावसाच्या रूपाने त्यांचे स्वर्ग लोकात देखील स्वागत केल्याचा आभास यावेळी झाला.

वहिनी आणि संपूर्ण जोशी परिवारावर कोसळलेल्या दुखा:त दै.मराठवाडा साथी परिवारासह बेदरे परिवार सहभागी असून प्रशांत जोशी यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढीच प्रार्थना ईश्वरचरणी करतो.

ॲड. संदीप बेदरे

बीड जिल्हा प्रतिनिधी दै.मराठवाडा साथी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या