Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नीट निरखून पहा..जे दिसतंय ते भविष्य आहे,जे गुलामगिरीच्या साखळदंडात बांधलं जातंय...

आपला ई पेपर अमळनेर



नीट निरखून पहा.. जे नजरेनं दिसतंय ते भविष्य आहे, जे गुलामगिरीच्या साखळदंडात आज बांधलं जातंय, ज्याची सुटका आजच नाही केली गेली, तर ते काळोख्या अंधारात हरवून जाईल. 

नव्या पिढीला आपण देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून पाहतो. परंतु सत्ताधाऱ्यांच्या लेखी या विचाराला काडीमोल भाव आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसवण्यात आलं. हे पाहूनच तळपायाची आग मस्तकात गेली. हा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.

स्वतःच्या गैर लोकशाही वर्तनासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी या निरागस बालकांचा वापर करणाऱ्या आणि लाज विकून खाणाऱ्या हा मंत्र्यांकडून अजून अपेक्षा तरी काय करणार?

या सगळ्यात आश्रमशाळेचं व्यवस्थापन देखील तेवढंच दोषी आहे. त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई व्हायला हवी. बड्या नेत्यांना खुश करण्यासाठी निरागस मुलांना रस्त्यावर बसवणं हे नैतिकेला धरून आहे का? याचं उत्तर द्या.

भविष्याला रस्त्यावर चिरडणाऱ्या या सत्तापिपासू लोकांचा मी धिक्कार करते.. निषेध करते..! असे वर्षा गायकवाड यांनी आपल्या सोशल मिडीया account वर पोस्ट केले आहे.

विनाशकाले विपरीत बुद्धी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या