Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MCE | स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमा बाबत राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण...

आपला ई पेपर



मुंबई Maharashtra Election Commission कडून ५ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये “सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी” असा उल्लेख करण्यात आल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यांत, अर्थात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चेवर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे.

MCE |स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आयोगाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, Maharashtra Election Commission राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजी यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये राज्य विधानसभेच्या मतदार याद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. 

“दिनांक १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगर पालविका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे”, असं या अधिसूचनेमध्ये MCE |राज्य निवडणूक आयोगाने नमूद केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या