Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PM | BJP |माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा ?असा सवाल |Pankaja munde | यांनी केला..

माझं राजकीय करिअर...Pankajamunde

Pankaja munde

पंकजाताई मुंडे यांनी षडयंत्र रचणाऱ्यांना फटकारले

लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा ; खोटया बातम्यांमुळे लोकं संभ्रमात

मला कांही करायचं असेल तर "डंके की चोट पे" करेन

आपला ई पेपर

मुंबई ।मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. मी त्यांना वैयक्तिक ओळखतही नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?” असा सवाल करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव Pankaja mundeयांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचणारांना चांगलेच फटकारले. लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, खोटया बातम्यांमुळे लोक संभ्रमात आहेत, खोटया बातम्या देणाऱ्या वाहिनीच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे आज त्यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.

  मागील दोन-तीन दिवसांपासून  सुरू असलेल्या चर्चांवर  Pankaja mundeयांनी आपली भुमिका स्पष्टपणे  मांडली. त्या म्हणाल्या, “मी आज पत्रकार परिषद बोलवली आहे, कारण मला शेकडो कॉल येत आहेत. २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर गेले चार वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वतःला सिद्ध करायच नाहीय. अनेक पक्षाचे नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे आल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं”.


माझं करिअर संपवण्याचा डाव कुणाचा?

पण आता मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?” असा सवाल पंकजाताई मुंडे यांनी केला. तुम्ही प्रश्न चिन्ह लावून बातम्या देता? पण त्यामागची सत्यता तपासली पाहिजे. मी गेली २० वर्षे राजकारणात काम करत आहे. चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र? हे पक्ष ठरवेल, मी कसं सांगू. पाठित खंजीर खुपसण्याचं रक्त माझं नाही. ज्या चॅनलने काँग्रेस नेत्यांची भेट घेतली ही बातमी दिली. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावे मागणार आहे?” असं त्या म्हणाल्या.


मी Pankaja munde ईश्वर साक्ष आज शपथ घेते की…..

माझ्यावर अनेक आरोप झाले. मला पराभव पत्करावे लागले. मीPankaja munde ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला, कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही” असं Pankaja munde यांनी सांगितलं. 

माझ्या भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात. मला विधान परिषदेला दोन्ही वेळा फॉर्म भरायला सांगितला. पण ऐनवेळी सांगितलं गेलं की फॉर्म भरायचा नाही, मी काही बोलले नाहीं कारण तो पक्षाचा आदेश आहे” असं त्यांनी  सांगितलं.


मी कुठलाही निर्णय 'डंके की चोट पर' करेन

भाजपाचा विचार माझ्या रक्तात आहे. पक्ष हा सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठी.अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी मुद्द्यावर बोलते. मला काही करायचं असेल तर मी 'डंके की चोट पे करेन' असंही Pankaja munde |म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या