Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दु:खद वार्ता |शब्द सुमनांच्या बादशाहाने निशब्द केले...

 

निशब्द.....


प्रशांत जोशी यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली.. 

परळी बातमीत नेमकं काय हवं, बातमीतील शब्दाचा वापर कसा हवा या बाबतींत सातत्याने मला प्रत्येकला..प्रोत्साहन देणारे आमचे गुरूंवर्य....! दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रशांत प्रभाकरराव जोशी यांचे उपचारादरम्यानआज दि.30 जुलै 2023 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 56 वर्ष होते.

प्रशांत जोशी यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील दवाखान्यात घेऊन जात असताना आज दि.30 जुलै 2023 रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशांत जोशी यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

दैनिक मराठवाडा साथी या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून ते काम पाहत होते.प्रशांत जोशी यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 4 वा.अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार बोरुळ तलाव स्मशानभूमी करण्यात येणार आहेत. जोशी परिवाराच्या दुःखात दै.मराठवाडा साथी, परिवार सहभागी आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या