Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLi | परळीत नामदेव शिंपी समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

हरिनाम व संत संगतीने मनुष्य जीवन सुखमय होते |ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के




आपला ई पेपर | PARLi |परळी वैजनाथ

येथील नामदेव शिंपी समाज परळी यांच्या वतीने सात दिवसापासून चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के हे होते.


त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी परळी शहरातील प्रमुख मार्गावरून संत श्री शिरोमणी नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा सवाद्य मिरवणुकीने निघाला होता. अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन पूर्ण निघालेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण परळीकरांचे लक्ष वेधले होते. येथील कृष्णा नगर भागातील श्री शिरोमणी नामदेव महाराज मंदीर सभागृहात संत नामदेव महारांजाच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
. त्यानंतर शहरातुन टाळ मृंदगाच्या गजरात भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली.पालखीचे भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत करीत पुजन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या.पालखीची सांगता झाल्यानंतर युवकांनी दहीहंडी फोडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री भजन  किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


संत श्री शिरोमणी नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतात प्रवास करून भागवत धर्माचा प्रसार केला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील ज्ञानदेववादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला होता.१२९१ साली नामदेवांची ज्ञानेश्वरांची भेट झाली. गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर नामदेव नागनाथ औंढा येथे गेले आणि विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला आणि शिष्यत्व पत्करले असल्याचे सांगून संत श्री शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विषयी अनेक उदाहरणे त्यांनी सांगून हरिनामाने व संत संगतीने मनुष्य जीवन सुखमय होते असेही यावेळी बोलताना सांगितले.


यावेळी PARLi पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने या सप्ताहात उपस्थित होते. दुपारी 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी समाजातील महिला, पुरुष, युवक व गावातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले आहेत. या सप्ताहात तरुण मंडळींचा सहभाग दिसून आला. शिंपी समाज परळी यांनी  टाळ-मृदंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन अवघी परळी नगरी सात दिवसांपासून दुमदुमली होती.


श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त PARLi परळी वैजनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास दिनांक 9 जुलै पासून उत्साहात सुरुवात झाली होती.ज्ञानेश्वरी पारायण कीर्तनास अनेक नागरिकांचा सहभाग होता.

संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज श्री संत नामदेव महाराज महिला मंडळ व श्री संत नामदेव महाराज युवक मंडळ परळी वैजनाथ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर कृष्णा नगर परळी वैजनाथ येथे बुधवार दिनांक 9 जुलै पासून सुरू असलेल्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयामुळे मोठ्या उत्साहाचे व भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


PARLi ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के हे होते. दरम्यान या पुण्यतिथी सोहळ्यात दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सात ते अकरा श्री ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, दोन ते चार श्री संत नामदेव चरित्र, चार ते सहा महिला भजनी मंडळ व धुपारती, रात्री आठ ते दहा हरीजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. 

दि. 15 जुलै  रोजी  सकाळी 11 ते 1:00 वाजता पारायण प्रमुख गीता भक्त श्री ह भ प संपत महाराज गिते गुरुजी यांचे पारायण संपन्न झाले. दि. 16 जुलै रोजी सकाळी 11 ते कीर्तनकार श्री ह भ प नारायण महाराज बारटक्के यांचे काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान उद्या 17  जुलै  रोजी प्रक्षाळ पूजा होणार असून यावेळी श्री संत नामदेव महाराज महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या