Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पत्रकारावर हल्ला..निकृष्ट रस्त्याच्या बांधकामाची बातमी का छापली? म्हणून..मारहाण

आपला ई पेपरहिंगोली

Police

कळमनुरी येथील दैनिकाचे पत्रकार मोहम्मद रफीक यांच्यावर हल्ला करण्यात आला.. आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद कळमनुरीने केली आहे..

कळमनुरी येथील दैनिकाचे तालुका प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी दिनांक एक जुलै 2023 रोजी दैनिक लोकमत समाचार मध्ये कळमनुरी शहरात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या बांधकामा बद्दल बातमी छापली होती.. अशी बातमी का लावली? म्हणून कळमनुरीच्या माजी नगराध्यक्षा चे पती यांनी त्यांना दिनांक ६ जुलै २०२३ रोजी सकाळी मारहाण केली.

पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या या संदर्भात कळमनुरी पोलीस निरीक्षक मुंडे यांची कळमनुरी शहरातील पत्रकारांनी भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 असता श्री मुंडे ह्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमनुरी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गुन्हा नों.क्रमांक ०४११/ २०२३ अन्वये भादवि ३२३, ५०४, ५०६  तसेच  महाराष्ट्र प्रसार माध्यम  व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक ) अधिनियम  2017 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


कळमनुरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने सदर आरोपीला तात्काळ हातात करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अलीमोद्दीन कादरी, यांनी केली आहे

*परळीत खुनाचा गुन्हा दाखल आरोपी मयत बंडू मुंडे यांची इनोव्हा कारसह फरार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_2.html*

*या वायरल पत्राची चर्चा सर्वत्र....*
https://aplaepaper.blogspot.com/2023/07/bjp-ncp-bjp.html

*BEED PARLI |हा सारा नियतीचा खेळ | ज्यांनी त्रास दिला त्यांचेही आभार..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed-parli.html*

*मोठी.. ब्रेकिंग*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या