Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED PARLI |हा सारा नियतीचा खेळ | ज्यांनी त्रास दिला त्यांचेही आभार..

 अंबाजोगाईतील हॉटेल व्यावसायिक प्रसाद पाठक यांची चिट्ठी लिहून आत्महत्या....


आपला ई पेपर 

बीड जिल्ह्यात आज रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना तब्बल चार घडल्या असून सदरील घटना दुःखदायक असून मनाला सुन्न करणारे आहेत.

प्रत्येक घटनेमागे कारणच असते आपण माणूस गेल्यानंतर या कारणाकडे दुर्लक्ष करतो आणि नेमके तिथेच गफलत होते अशी कुटुंब उध्वस्त करणारे संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात परंतु त्यातही मार्ग असतात तो मार्ग सर्वांना मिळावा असे यावेळी वाटते ...


परळीतील चिंचेच्या झाडाला रेल्वे परिसरात केलेली आत्महत्या असो की बीड येथील स्वतःच्या गॅरेजमध्ये केलेली आत्महत्या असो..धक्कादायक आहेत.

परळीतील रहिवासी असलेले काही दिवस परळीत व्यवसाय करणारे अंबाजोगाई येथील हॉटेल व्यावसायिक प्रसाद प्रभाकर पाठक वय 37 यांनी आज आनंदनगर परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही दुर्घटना आज मंगळवारी रोजी सकाळी 10 वाजता समजली.

प्रसाद पाठक हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत 'हा सारा नियतीचा खेळ, ज्यांनी मदत केली त्यांचे आभार, ज्यांनी त्रास दिला त्यांचे पण आभार' असा मजकूर लिहिला आहे. अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या पाठक यांनी आत्महत्या केल्याचे समजताच  आंबेजोगाई परिसरातील नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त होत आहे. 

पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

हा video ,,



*बीडचा होतो बिहार...|*
*भररस्त्यात प्रतिष्ठित व्यापाऱ्याची हत्या...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed.html*

*मोठी.. ब्रेकिंग*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या