Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हरितक्रांतीचे प्रणेते मा.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

 आपला ई पेपरअंबाजोगाई 

अंबाजोगाई,

अंबाजोगाई येथे हरित क्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत शहरातील व ग्रामीण भागातील 25 शाळेतिल 3000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सदर निबंध स्पर्धा ही भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था शाखा

अंबाजोगाई यांच्या वतीने घेण्यात आले.सदरच्या या निबंध स्पर्धेतील छोट्या गटातून इयत्ता. ५वी ते ७वी प्रथम कु.श्रावणी ओमकार कागणे (७वी) संकल्प विद्यामंदिर आंबेजोगाई, द्वितीय कु.अक्षरा योगीराज मोरे (७वी)कै.दे.बा.ग.यो.नु.वि.मेडिकल परिसर अंबाजोगाई.आणि तृतीय चि.अरहनी जावेद शेख (७वी) कै.दे.बा.ग.यो.नु.वि.मंदिर विभाग अंबाजोगाई.व मोठ्या गटातून ८वी ते १०वी प्रथम चि.अनुराग बाळासाहेब जगताप (९वी) यो.नु.वि.अंबाजोगाई, द्वितीय कु.भक्ती श्रीराम केंद्रे (१०वी) गुरुदेव विद्यालय मोरेवाडी,अंबाजोगाई. तृतीय कु.तनवी महादेव गुव्हे (१०वी) खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई.आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस व गुणगौरव सोहळा दिनांक.9 जुलै 2023 रोजी वसंतराव नाईक आश्रम शाळा येथे आयोजित करण्यात आला.

         या सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच निवृत्त झालेले कर्मचारी यांचे सत्कार व NEET, JEE, 10 वी,12 वी मध्ये प्रविण्य मिळवलेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह, व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा विभागाचे गटसचिव आदरणीय श्री.रामरावजी आडे सर,प्रमुख मार्गदर्शक डॉ.मांगीलालजी राठोड जिल्हाध्यक्ष बीड,

प्रदेशाचे महासचिव डॉक्टर प्राचार्य किसनरावजी पवार साहेब,डॉक्टर प्राचार्य प्रकाशरावजी जाधव,वसंतराव नाईक आश्रम शाळेचे अध्यक्ष,अनीलरावजी राठोड साहेब याप्रसंगी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष श्री पंडित चव्हाण सर यांनी यांनी केले.सूत्रसंचलन सचिव श्री यशवंत आडे यांनी केले व आभार धर्मराज राठोड सर यांनी केले.हे कार्यक्रम यशस्वी करण्यादाठी विक्रम चव्हाण सर,बाळासाहेब राठोड सर, धनराज राठोड सर, मधुकर राठोड, जाधव सर इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

*हेही वाचा या वायरल पत्राची चर्चा सर्वत्र....*
https://aplaepaper.blogspot.com/2023/07/bjp-ncp-bjp.html

*हेही वाचा...BEED PARLI |हा सारा नियतीचा खेळ | ज्यांनी त्रास दिला त्यांचेही आभार..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed-parli.html*

*मोठी.. ब्रेकिंग*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या