Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संपादक ज्ञानोबा सुरवसे यांना बंधूशोक

 

तातेराव सुरवसे यांचे र्‍हदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन


आपला ई पेपर | परळी

दै.महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांचे बंधू तातेराव नामदेवराव सुरवसे यांचे र्‍हदयविकाराचा तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षे होते. 

कामानिमित्त तातेराव सुरवसे हे उस्मानाबाद येथे गेले असता अचानक त्यांना र्‍हदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात नेले असता उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. कै. तातेराव सुरवसे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी नागडगाव (ता. माजलगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कै. तातेराव सुरवसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, भावजयी, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.त्यांच्या दुःखात आपला ई पेपर परिवार सहभागी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या