Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ACB धाड | संपादकासह एकासलाच स्वीकारताना दोघांना एसीबीने घेतले ताब्यात

30 लाख रु चेक शेतकऱ्याला काढुन देण्यासाठी संपादकासह इसमाने 2 लाखाची केली मागणी


उस्मानाबाद (धाराशिव) 

30 लाख रकमेचे चेक शेतकऱ्याला काढुन देण्यासाठी संपादकासह खाजगी इसमाने दोन लाखाची लाच मागणी केली होती. 

जिल्ह्यातील 77 वर्षीय तक्रारदार पुरूषाच्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन पाझर तलाव व साठवण तलावासाठी शासनाने संपादित केलेली आहे. 

या जमिनीचा उस्मानाबाद प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन संपादित जमीनीचा अधिकचा मोबदला काढून देण्यासाठी अनिरुद्ध अंबऋषि कावळे वय 52 वर्षे, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद व दैनिक मराठवाडा योध्दाचा संपादक बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे वय 42 वर्षे, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद या दोघा खाजगी इसमांनी 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

सदर लाच रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारताना दोघांना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 77 वर्षीय शेतकऱ्याच्या पत्नीची शेतजमीन पाझर तलाव व साठवण तलावासाठी शासनाकडून संपादित करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदाराच्या पत्नीला 26,56,017/- रुपये व 4,31,798/-  असे एकुण 30 लाख 87 हजार 815 रूपयांचे दोन चेक मिळणार होते. उस्मानाबाद प्रांत कार्यालयातून हे दोन चेक काढून देण्यासाठी दैनिक मराठवाडा योध्दाच्या संपादकासह एका खाजगी इसमाने दोन लाख रूपयांची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना दोघांना एसीबीने पकडले आहे.

ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांचा समावेश होता.

दरम्यान, 30 लाख 87 हजार 815 इतक्या रकमेचे चेक शेतकऱ्याला काढुन देण्यासाठी संपादकासह खाजगी इसमाने दोन लाखाची लाच उस्मानाबाद प्रांत कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्यासाठी स्विकारली होती का? याचाही शोध एसीबीकडून सुरु करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.