परळी शहरात राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळते हे खूप महत्त्वाचे | महेश पाटील
परळी |प्रतिनिधी
परळी शहरात बंसल क्लासेसच्यामाध्यमातून गुणवंत विद्यार्थी निर्माण होत आहेत याचा मनापासून आनंद वाटतो एवढेच नाही तर चंदुलाल बियाणी यांच्या माध्यमातून बंसल क्लासेसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण येथे उपलब्ध झाले आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि क्षमता निर्माण करण्याची संधी या भागातील विद्यार्थ्यांना या क्लासेसच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे शिक्षण तज्ञ महेश पाटील यांनी सांगितले.
बसल क्लासेस च्या वतीने इयत्ता दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंसल क्लासेसचे राज्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हरिश्चंद्र वंगे दादा डॉ, रामेश्वर बांगड़, कैलास घुगे, राकेश चांडक उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण जवळपास 650 विद्यार्थी परळी शहर व ग्रामीण भागातून आले सर्वांचे सत्कार या वेळी करण्यात आले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समरोप बंसल क्लासेसचे ब्रांच मनेजर विनोद दरादे यांनी केले.
Social Plugin