Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ईडी मार्फत चौकशी | महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ मध्ये बोगस बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ -वसंत मुंडे

 बीड | प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यांतर्गत बोगस बियाणे  खते कीटकनाशके औषधे पुरवणाऱ्या कंपन्यांनी धुमाकूळ घातल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.


निसर्गाची साथ नसल्यामुळे  शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला असून शासनाची बाजारपेठेवर नियंत्रण नाही  त्यामुळे कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. 

शेतीमालावर विविध कर लावल्यामुळे शेतकरी स्वतःचा माल बाजारपेठेत विक्री व खरेदी करताना हातबल झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील कृषी  खाते ऑनलाईन ऑफलाइन परवाने सर्व कागदपत्रे तपासून जिल्हा कृषी अधीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक , मुख्य गुण नियंत्रक, संचालक गुण नियंत्रण व निविष्ठा, कृषी आयुक्त मार्फत फाईल खते बी बियाणे औषधी संदर्भातील सर्व पुरावे जोडून कार्यालयात दाखल केली जाते.


कंपनीची लायसन देण्याचे प्रक्रियेमध्ये खते बी बियाणे कीटकनाशके औषधी यांचे नमुने घेऊन शासनमान्य प्रयोगशाळेत प्रमाणित अप्रमाणित संदर्भातील रिपोर्ट देणे बंधनकारक आहे. कृषी खात्याची विविध लायसन देण्यासंदर्भात नियमावली असली तरी मंत्रालयातील कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्या  कार्यालयातील अधिकाऱ्या बरोबर आर्थिक व्यवहाराचा आशीर्वाद घेऊन कृषी खात्यातील गुण नियंत्रण व निविष्ठा विभागातले सोनेरी टोळीने बोगस बियाणे खते औषधी लायसन संदर्भात धुमाकूळ घातल्याची चौकशी करण्याची मागणी ओबीसी काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली. 


सदोष व निकृष्ट बियाणे उगवले नाही तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची भारत देशामध्ये कायद्यामध्ये तरतूद नाही या करिता शेतकऱ्यांनी खते बि बियाने औषधी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी अशी आव्हान काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केले. कृषी मंत्रालयातील बदल्या संदर्भात जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी निविष्ठा संचानालय कार्यालय यांचे लहान मोठ्या जिल्ह्यामध्ये 25 ते 65 लाखापर्यंत बदलीचा दर असल्यामुळे विविध अधिकाऱ्यांनी स्वतःचे पैसे अनेक कंपनीमध्ये गुंतलेले असून शासनाचे काम करण्याऐवजी बनवलेल्या वस्तू खत बी बियाणे औषधी विक्री व पैसे वसुली  करणे एवढा मोठा धंदा या अधिकारी वर्गात चालू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.


गुण नियंत्रण व निविष्ठा विभागामार्फत संशोधक, शास्त्रज्ञ अभ्यासक प्रतिनिधी व्यवस्थापकीय संचालका पर्यंत साखळी तयार असून काळे बाजार वाले मध्य प्रदेश गुजरात मधून विविध बियाणे खरेदी करून गुण नियंत्रण विभागातील सोनी टोळक्याला हाताशी धरून सर्व नमुने अप्रमाणित निघाली तरीही आर्थिक व्यवहार करून प्रमाणित बियाणे खते औषधी आहेत असे दर्शवून लायसन वितरित केले जातात या सर्व मुद्देनिहाय  केंद्र व राज्य सरकारकडे सीबीआय ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या