Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | परळीत चक्क पहाटेच अवैद्य धंदे सुरू|रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसरात बिंगोचा धुमाकूळ

|मटका,बिंगो,अवैध गुटका विक्री, जुगारा हे अवैद्य धंदे


PARLI|परळीत चक्क पहाटेच अवैद्य धंदे सुरू|रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसरात बिंगोचा धुमाकूळ  बंद करा |बहादुरभाई 

आपला ई पेपर परळी

परळी शहरातील शहर व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेले  मटका,बिंगो,अवैध गुटका विक्री, जुगारा सारखे अवैद्य धंदे तात्काळ बंद करा अन्यथा परळी शहर काँग्रेसच्या वतिने आंदोलन करण्याचा इशार काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी दिला आहे.

परळी शहर काँग्रेसच्या वतिने आज मंगळवार दि.27 जुन रोजी शहर व संभाजी नगर पोलिस स्टेशनला शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वावात निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे कि,यापुर्वी बीडच्या पोलिस अधीक्षकांना यांना दि.16 जुन रोजी दिलेले निवेदन दिले होते परंतु आज पर्यंत या निवेदनाची दखल घेतली गेली नसल्यामुळे परंत आज परळी शहर,व संभाजी नगर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

परळी शहर पोलिस स्टेशन व संभाजी नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक अवैध धंदे चालू असून त्यात मुख्यता बिंगो आणि गुटका जोराने चालू आहेत. बिंगोमुळे नव युवक देशोधडीला लागत असुन कर्ज बाजारी होत असून व्याजदारी वाढत आहे आणि कर्जा पोटी चुकीचे काम नव युवक करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र सरकारने आरोग्य च्या पार्श्वभूमीवर गुटका बंदी केलेली असताना आपल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत बाहेर राज्यतून गुटका परळीत आणून तो विकला जात आहे.

परळी शहरातील सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करावे, नुसताच बंद न करता ते पून्हा  सुरू होणार नाही या बाबत गांभिर्यानी दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी सात अवैध धंदे बंद झाले नाही तर परळी शहर काँग्रेस आपल्या पोलिस स्टेशन समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष बहादुरभाई व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष बहादुरभाई,कार्याध्यक्ष  शशी चौधरी, जेष्ठ नेते नरेश अप्पा हालगे,उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सरचिटणीस शिवाजी देशमुख,कोषाध्यक्ष फरकुंद अली बेग,प्रवक्ते बद्दार भाई, विधानसभा युवक अध्यक्ष रणजित देशमुख,शहरअध्यक्ष अलीम भाई,सुनील देशमुख,अनुसूचित जाती जमाती दीपक शिरसाट,ओबीसी अल्पसंख्याक अध्यक्ष रसूल खान,जावेदभाई, रवी अदी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या