Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्व.सुवालालजी वाकेकर यांचे कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय|खा.डॉ.प्रितमताई मुंडे

काकाजींचा वारसा चालवत असल्याबद्दल केले कौतुक,कुटुंबियांसह अनेकांनी केले समाधीस्थळी अभिवादन

आपला ई पेपर परळी वैजनाथ 

     स्व.सुवालालजी वाकेकर वाकेकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. त्यांचा जनसेवेचा वारसा त्यांची पिढी पुढे चालवत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले. स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या.


 

        शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय भरीव काम करून आपले अढळ स्थान निर्माण केलेले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी गंगाखेड रोडवरील स्व. वाकेकर यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, जवाहर शिक्षण संस्था, लिटल प्लावर एज्युकेशन सोसायटी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आदी नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी निस्वार्थीपणे राजकारण केले. गरजवंतांना मदत करण्याची आणि केलेली मदत जाहीर न करण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगुन त्या म्हणाल्या की, स्व. सुवालालजी वाकेकर यांना सर्वजण काकाजी म्हणत असत आणि त्यांनीही अगदी सर्वांना त्याच भावनेने, प्रेमाणे वागणूक दिली. त्यांचा जनसेवेचा आणि गरजवंतांना मदत करण्याचा वारसा त्यांची पुढील पिढी चालवत आहे. हे अतिशय कौतुकास्पद असुन वाकेकर परिवाराच्या समाजोपयोगी कार्याला शुभेच्छा असल्याचे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. 

        यावेळी विजयकुमार वाकेकर, डॉ. प्रकाश वाकेकर, दिपक वाकेकर, सौ. दिपाली जैन आदी कुटुंबियांसह भाजपचे सचिव राजेश देशमुख, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, वैद्यनाथ देवस्थानचे सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख, बन्सल क्लासेसचे मुख्य प्रवर्तक चंदूलाल बियाणी, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक अनिल तांदळे, संदीप लाहोटी, निर्मळे, कचरूलाल वांगीकर, सावन कुचेरिया, वसंतराव देशमुख, शितल पोकर्णा, सतीश सारडा, संजय लुंकड, धिरज गोहिल, सुदर्शन वाडकर, मनोज बोरा, शैलेंद्र देवधरे, चंद्रकांत देवकते यांच्यासह अनेककांची उपस्थिती होती.

कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन

      स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाकेकर कुटुंबातील सर्व सदस्यांनी गंगाखेड रोडवरील काकाजींच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. आज मंगळवारी सकाळपासून परळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काकाजींच्या समाधीस्थळी अभिवादन केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहुन काकाजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आलेल्या सर्वांचे विजयकुमार वाकेकर यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या