Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ग्रामीण भागात आधुनिक शालेय शिक्षण व आरेना स्विमिंग |खा.प्रीतमताई मुंडे यांनी केले कौतुक

परळीत पोदार लर्न स्कूल येथे खा. प्रीतमताई मुंडे यांची भेट...


परळी / प्रतिनिधी 

शहरात ग्रामीण भागात सुद्धा आधुनिक पद्धतीचे शालेय अभ्यासक्रम व स्विमिंग पूल च्या माध्यमातून आधुनिक जीवनशैली बाबत खा.प्रीतम ताई मुंडे यांनी कौतुक केले.


परळी शहरात चांगल्या शिक्षणाची असलेली गरज पोदार लर्न स्कूलच्या माध्यमातून पूर्ण होत असून एक परिपूर्ण आणि आव्हानात्मक शिक्षण येथे उपलब्ध होत असल्याचा आपणास आनंद असून भविष्यात या शाळेतून राष्ट्र उभारणीसाठी चांगले विद्यार्थी घडतील असा विश्वास खा. प्रीतम ताई मुंडे यांनी व्यक्त केला. आरेना स्विमिंग पूल आणि पोदार लर्न स्कूल येथे खा.प्रीतमताई मुंडे यांनी भेट दिली. असता अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती यांनी खा.प्रीतमताई मुंडे यांचा सत्कार केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य मंगेश काशीद सर उपप्राचार्य लक्ष्मण पाटील सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख ,वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत विजय वाकेकर ,अनिल तांदळे, कचरूलाल तातेड,महेश निर्मळे, सतीश सारडा संजय लुंकड डॉ. प्रकाश वाकेकर शितल पोखर्णा, महावीर वांगीकर, सावन कुचरिया, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या