Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|NEET|परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गोरगरीब जनतेची सेवा करावी |प्रा.बडे

 वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वडवणी | प्रतिनिधी 

 नीट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फक्त एमबीबीएस डॉक्टरच न होता इतर  प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेता , सामाजिक यासह सर्वच क्षेत्रात सहभागी होऊन कामे करून आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे कामे करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे असे विचार मराठी पत्रकार परिषद


वडवणी तालुका यांच्या वतीने परिषद कार्यालयात आयोजित मेडिकल शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ  कार्यक्रमाचे वेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा.सोमनाथराव बडे यांनी मांडले.


मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका यांच्या वतीने तालुक्यातील मेडिकल नीट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थीनी व मेडिकल शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी यांच्या गुण गौरव सोहळ्याचे आयोजन काल दि.18 जुन रविवार रोजी सकाळी अकरा वाजता साळींबा रोडवरील परिषद कार्यालयात करण्यात आलेले होते या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.सोमनाथराव बडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.

ज्ञानेश्वर निपटे,माजी तालुकाध्यक्ष रामेश्वर सावंत, भगवान निपटे सर हे होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीएएमएस शिक्षण पूर्ण करणारी विद्यार्थीनी दिव्या शिवाजी गार्डी, तसेच नीट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी श्रीकृष्ण रामेश्वर सावंत, संतोष बळीराम डांबे,प्रिती शिवाजी धायतिडक,अजय लक्ष्मण बडे, सोनल ज्ञानेश्वर निपटे,शेजल भागवत निपटे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.निपटे,अनिल वाघमारे,प्रा.खळगे तसेच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्रा.सोमनाथराव बडे म्हणाले कि आज ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे मुलं,मुली सुद्धा शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळवत असुन नीट परिक्षा, युपीएससी, एमपीएससी यासह इतर परिक्षेत चांगले गुण मिळवुन उत्तीर्ण होत आहेत.त्यामुळ नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी हि फक्त डॉक्टरच होण्याचे स्वप्न न पाहता प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक यासह सर्वच  क्षेत्रात काम करून गोरगरीब जनतेचे कामे करून त्यांना न्याय मिळवून द्यावा असे ते म्हणाले  यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार अँड.विनायकराव जाधव (अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद वडवणी), पत्रकार सोनवणे सतीष (मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका सचिव) पत्रकार सुधाकर पोटभरे (माजी अध्यक्ष), पत्रकार शांतीनाथ जैन (कोषाध्यक्ष), पत्रकार ओमप्रकाश साबळे (डिजिटल मिडिया अध्यक्ष), पत्रकार महेश सदरे (सदस्य), पत्रकार हरीभाऊ पवार (सदस्य), पत्रकार शंकर झाडे (सदस्य), पत्रकार अतुल जाधव (सदस्य), पत्रकार वाजेद पठाण (सदस्य) सह आदींनी परिश्रम घेतले .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव तर आभार प्रदर्शन सतिषराव सोनवणे यांनी केले.यावेळी विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या