Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या रेल्वे रद्द |परळी ते पूर्णा एक्स्प्रेस या दिवसा पर्यंत रद्द

परळी आपला ई पेपर

दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय यांनी नुकतेच एक प्रेस नोट काढली असून दि18.06.2023 रोजी दिलेल्या माहिती नुसार..


सध्या धावत असलेल्या काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर
विविध ठिकाणी सुरु असलेले रेल्वेचे विस्तार आणि मुलभूत सुविधांचे विकास कामे करण्याकरिता तसेच रेल्वे पटरी चे कामे करण्या करिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

01) गाडी संख्या 07599 पूर्णा परळी वैजनाथ एक्स्प्रेस दिनांक 19 जून ते 25 जून, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

02) गाडी संख्या 07598 परळी वैजनाथ पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 19 जून ते 25 जून, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

03) गाडी संख्या 07853 निझामाबाद नांदेड एक्स्प्रेस दिनांक 19 जून ते 26 जून, 2023
दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

04) गाडी संख्या 07854 नांदेड- निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 18 जून ते 25 जून, 2023
दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

१) गाडी संख्या 11409 दौंड निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 18 जून ते 24 जून दरम्यान मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली

२) गाडी संख्या 01413 निझामाबाद पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 19 जून ते 25 जून दरम्यान

निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती नांदेड जनसंपर्क कार्यालय यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या