Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

NEET | पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी राहिलेला चि.पार्थ कराडचे नीट परिक्षेत यश

पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी राहिलेला चि.पार्थ कराडचे नीट परिक्षेत यश

परळी प्रतिनिधी
परळी पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी राहिलेला चि.पार्थ बाळासाहेब कराड यांनी वैद्यकीय प्रवेश पाञ नीट परिक्षा 2023 या राष्ट्रीय परिक्षेत 680 गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले आहे.

परळी शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पोदार लर्न स्कूल हे वरदान ठरत असून या स्कूलचा 2020- 21 बॅच चा इयत्ता दहावीतील विद्यार्थी चि.पार्थ बाळासाहेब कराड याने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट 2023 च्या परीक्षेत 680 गुण घेऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे त्याच्या या यशाबद्दल अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी , सहसचिव श्री.धीरज बाहेती ,अकॅडमीक डायरेक्टर श्री.बी.पी.सिंग, बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती,प्राचार्य श्री.मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. कौतुक करून पुढील  यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या