Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BRS |शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी BRS ला साथ आवश्यक |ॲड.माधव जाधव

अंबाजोगाईपरळी 

विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे भारत राष्ट्र समितीच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना ॲड. माधव जाधव यांनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी  BRS ला साथ द्या अशा प्रकारची साद घातली.


के चंद्रशेखर राव साहेब यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये अभियान अतिशय जोरामध्ये चालू आहे.

परळी विधानसभे अंतर्गत असणाऱ्या संपूर्ण गावामध्ये भारत राष्ट्र समितीचे परळी विधानसभा प्रमुख ॲड माधव जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांचे नोंदणी अभियान सध्या चालू असून अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले.गिरवली येथील बी आर एस चे युवा नेतृत्व अमोल भैया बावणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बोलत असताना ॲड माधव जाधव यांनी भारत राष्ट्र समितीचे  तेलंगणा मधील विकासाचे मॉडेल हे संपूर्ण महाराष्ट्रात व भारत देशामध्ये आणण्यासाठी तसेच शेतकरी आत्महत्या कायमच्या बंद होण्यासाठी,शेतकरी ,कष्टकरी, शेतमजूर,व्यापारी,शिक्षण या संपूर्ण क्षेत्रामध्ये जर सर्वांगीण विकास साध्ये करायचा असेल व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करावयाचा असेल तर के चंद्रशेखर राव साहेब यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाशिवाय पर्याय नाही.अशा प्रकारची भूमिका ॲड.माधव जाधव यांनी मांडली.त्याचप्रमाणे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे,माता भगिनींना संरक्षण देणे, स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे,आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करून आरोग्याच्या सुविधा व शिक्षण व हे सर्वांना मोफत दिले पाहिजे अशा प्रकारची भूमिका ॲड माधव जाधव यांनी यावेळी मांडली.

यावेळी मंचावर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे नेते कालिदास राव आपेट यांनी सुद्धा शेतकऱ्यांची लूट आतापर्यंतच्या सरकारांनी कशी केली व परळी विधानसभा मतदारसंघातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कसे बुडवले याबद्दल सविस्तर अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. तसेच परळी विधानसभेमध्ये जर संपूर्ण विकास साध्य करावयाचा असेल तर ॲड.माधव जाधव यांना आपण निवडून द्यावे अशा प्रकारची भूमिका कालिदासराव आपेट यांनी मांडली.यावेळी भारत राष्ट्र समितीचे भगवानराव वांगे,अमोल बावणे ,दत्ताभाऊ साळुंखे,हरिदास आपेट सर व तसेच श्रीकृष्ण चाटे यांनीही आपली मते मांडून येणाऱ्या काळामध्ये भारत राष्ट्र समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये भारत राष्ट्र समितीचे सरकार आणण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला संदीप गाढवे,राजकुमार बावणे,आदित्य साळुंखे, पप्पू आपेट व असंख्य तरुण बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तम दादा बावणे हे होते तर आभार प्रदर्शन अमोल भैया बावणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या