Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत चंदुलाल बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त... रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

रक्तदात्यांचा प्रशिस्तीपत्र, स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सन्मान....


परळी आपला ई पेपर

राजस्थानी समूहाचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः या रक्तदान शिबिरात अनेक महिलांनी रक्तदान करून आपले कर्तव्ये बजावले होते. या सर्व रक्तदात्यांचा रक्तदान शिबीर आयोजकांच्या वतीने प्रशिस्तीपत्र,स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे ज्या महिलांनी रक्तदान केले होते,त्या सर्व महिला वर्गाचे विशेष सत्कार करण्यात आला, व विशेष भेटवस्तू देण्यात आली


.

    मागील तीन वर्षांपासून दर तीन महिन्यांत रक्तदान शिबीर, या संकल्पनेतून,सन्मानिय चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते,सामाजिक बांधिलकी या प्रांजळ भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते


,व भविष्यात ही सामाजिक बांधिलकी जपवणूक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले, राजस्थानी मल्टिस्टेट गणेशपार शाखेच्या माध्यमातून रक्तदाता गौरव हा विषेश असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात,राजस्थानी मल्टिस्टेट मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही बी कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी जी कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक अर्चना मुंदडा,मुख्य शाखा व्यवस्थापक वंदना कांबळे, गोपाळ इंगळे,ईश्वर जठार, उपाध्याय यांच्या सह सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता,कार्यक्रमाचे प्रस्ताविक रक्तदान शिबीराचे मुख्य संयोजक राजस्थानी मल्टिस्टेट साथी कार्यकारी संपादक सचिन स्वामी यांनी केले तर  आभार प्रदर्शन ठाकूर मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या