Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांची पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांशी |थेट-भेट



चित्रपटसृष्टीत जसे अभिनय कौशल्यात विनोदाचे अचूक टायमिंग आवश्यक तसेच शालेय जीवनात सुद्धा महत्त्वपूर्ण आहे-अभिनेता भरत जाधव 

परळी | प्रतिनिधी



परळी येथे मराठवाडा साथी सांस्कृतिक मंडळ व राधामोहन साथी प्रतिष्ठान आयोजित भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित केदार शिंदे लिखित दिग्दर्शित भरत जाधव यांची 14 विविध भूमिका असलेले सिनेमॅटीक नाटक तू तू मी मी आयोजित करण्यात आले असून या नाटकाच्या निमित्ताने ते परळी शहरात आले असता त्यांनी आज दि 21 जून रोजी परळी शहरातील पोदार लर्न स्कूल येथे भेट दिली.


मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्य आणि विनोदी भूमिकातून अभिनेता भरत जाधवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.जत्रा, खबरदार,पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत.चित्रपटसृष्टीत जसे अभिनय कौशल्य आणि विनोदाचे अचूक टायमिंग आवश्यक आहे. तसेच शालेय जीवनातही योग्य टायमिंगच्या प्लॅनिंगवरच यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो आणि तो महत्त्वपूर्ण ठरतो.आज दि 21जून रोजी परळी शहरातील पोदार लर्न स्कूल येथे अभिनेता भरत जाधवने भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या भेटीदरम्यान बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.


 अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, यांच्या हस्ते सुप्रसिद्ध सिने अभिनेते भरत जाधव यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी , सहसचिव श्री.धीरज बाहेती ,अकॅडमीक डायरेक्टर श्री.बी.पी.सिंग, बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती,प्राचार्य श्री. मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या