Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पोदार लर्न स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

संस्कृती,संस्कार आणि योग हे जीवनात महत्वपूर्ण |वीर श्री वशिष्ठ जी आर्या 


परळी प्रतिनिधी 

आज दि 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जातो या निमित्ताने राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे


विद्यार्थी व शिक्षक यांनी आज सकाळी 6:30 ते 8 यावेळेत योगासने व योगाचे महत्त्व काय यावर निमंत्रित वीर श्री वशिष्ठ जी आर्या यांनी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विविध योगासनाचे फायदे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


दि. 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषीत केलेला आहे. गत 05 वर्षापासून देशात, राज्यात व जिल्हयात योग दिन मोठया प्रमाणात साजरा केला जातो आहे. 

यानिमित्ताने पोदार लर्न स्कूल येथे वैद्यनाथ महाविद्यालयातील प्राध्यापिका सुप्रसिद्ध योग शिक्षिका डॉ.वीरश्री वशिष्ठजी आर्या


यांना निमंत्रित केले होते. 


यावेळी शिक्षिका डॉ.वीरश्री बोलताना म्हणाले की योगाभ्यासामुळे जीवनात किती बदल होतात, योग हे जीवनात किती महत्वपूर्ण आहेत याविषयी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती दिली.






यावेळी अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी , सहसचिव श्री.धीरज बाहेती ,अकॅडमीक डायरेक्टर श्री.बी.पी.सिंग, बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती,प्राचार्य श्री. मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या