Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास प्रतिसाद एक हजार विद्यार्थिनींचा सहभाग

अंबाजोगाई | प्रतिनिधी

योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित श्रीमती गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयात 'जागतिक योग दिनी' एक हजार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.


संपूर्ण जगभरात २१ जून हा 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.त्या निमित्त्याने  विद्यार्थिनींना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व सांगण्यात आले  पद्मासन,बद्धपद्मासन,तोलासन,वज्रासन,सुखासन,चक्रासन,ताडासन,वृक्षासन,शिर्षासन,शवासन यांसह विविध आसनप्रकार,सूर्यनमस्कार तसेच  स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे कपालभाती,अनुलोम-विलोम,भ्रामरी इ.प्रकारचे प्राणायाम,ओंकार जप ,ध्यानधारणा  प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.मुख्याध्यापिका तसेच शिक्षिका,कर्मचारी आदींनी सहभाग घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या