Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

परळी | प्रतिनिधी

येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेच्या १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ वी बोर्ड परिक्षेत महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.


येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात कला व विज्ञान शाखा आहे. या शाखेतील १२ बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. संजय देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, प्रा. डॉ विवेकानंद कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी कला शाखेतून १२ वी बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या नंदिनी जाधव, धनश्री गुट्टे, भाग्यश्री पांचाळ व विज्ञान शाखेतील धनश्री तांदळे, कल्याणी वडूळकर, स्नेह शिंदे यांचा व आई-वडीलांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृती चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवल्याबदल वैष्णवी नागरगोजे, तेजस्विनी बनसोडे,नेहा राडकर, प्राची राजमाने, वैभवी स्वामी या विद्यार्थिनींसह इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, गृह विज्ञान, रसायनशास्त्र, गणित या विषयात महाविद्यालयातून पहिला व दुसरा क्रमांक पटकावल्याबदल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी प्रा.डॉ विवेकानंद कवडे, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.प्रविण नव्हाडे यांनी, सुत्रसंचालन प्रा. प्रविण फुटके, आभार प्रा.विणा पारेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विशाल पौळ, प्रा.आचार्य मँडम, प्रा.आशिलता शिंदे आदिंनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या