Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत श्रीमती गोदावरी कुंकूंलोळ यो.कन्या विद्यालयाचे घवघवीत यश


अंबाजोगाई / प्रतिनिधी 

या शैक्षणिक वर्षा मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्रीमती गो.कु.यो.कन्या विद्यालयाचा एकूण निकाल ९९.०२ टक्के इतका लागला असून विद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले असून ६१ विद्यार्थिनीनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे. विद्यालयातील वैष्णवी चंद्रकांत पौळ हिने ९८.८० टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे स्वानंदी सचिन कन्नडकर हिने ९८.४० टक्के गुण घेऊन व्दितीय तर आळंदी सुनिल रानभरे या विद्यार्थिनीने ९८.२० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यालयातील ३०८विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या त्यातील ३०५ यश प्राप्त केले आहे.

विशेषप्राविण्यासह१८७,प्रथमश्रेणी ६९, व्दितीय श्रेणी आणि संस्कृत विषयात २९ विद्यार्थिनींनी शंभर गुण घेतले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन यो.शि.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे,पदाधिकारी ॲड.एस.टी.कऱ्हाड,कमलाकर चौसाळकर,जी.बी.व्यास,प्रा. एम.एस.लोमटे,सौ.वाय.एच. राठोड,मुख्याध्यापिका एम.एस.कुलकर्णी इतर शिक्षिका,शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी आदींनी केले आहे.

*अंबाजोगाईत हे गैरकृत्य |या दलालाच्या माध्यमातून आजही राजरोसपणे भ्रष्टाचार सुरुच..*

https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_45.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या