Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत भगवान विद्यालयाच्या वारकरी दिंडीने परिसर दुमदुमला





आपला ई पेपर

परळी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर  भगवान विद्यालय वैजनाथ प्रिया नगर येथे भव्यदिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यात शालेय विद्यार्थी पालक वर्ग व शाळेतील सर्व कर्मचारी यांनी प्रिया नगर  दिपाली नगर या विभागातून दिंडी काढल्याने शालेय परिसर दुमदुमून गेला होता .

   पारंपारिक वेशभूषेत निघालेल्या या दिंडीमध्ये शाळेतील कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक लिंबाजी माधवराव दहिफळे , अनंत आप्पाराव मुंडे ,श्री तिडके सर श्री वेडे सर श्रीमती सोनवणे मॅडम श्रीमती वाघमारे मॅडम श्रीमती कुलकर्णी मॅडम श्री महेंद्र वाघमारे श्री सचिन आंबाड श्री राजेसाहेब विभुते श्री चव्हाण सर श्री गवळी सर श्री गोविंद मुंडे सर यांनी दिंडीत मोलाचे सहकार्य केले.

 या वारकरी दिंडीमध्ये अनेक साधुसंतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि खास करून विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती सादर केलेल्या गणेश हनुमान दडगे आणि अपूर्वा लक्ष्मीकांत देशपांडे या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

      शाळेतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशाला महत्त्व देऊन तसा पेहराव केला व महिलांनी नऊवारी साडी घालून या दिंडीत आपल्या पारंपारिक परंपरेचे दर्शन घडविले .

    प्रिया नगर येथील हनुमान मंदिरात दिंडीची सांगता झाली त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री लिंबाजी दहिफळे यांनी विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक केले व संस्कृतीची जोपासना संत वाङ्मयाची पाठराखण करत अध्यात्मिक विकास ही काळाची गरज असल्याचे आवर्जून सांगितले .

      या वारकरी दिंडीचे संयोजन अनंत मुंडे व गोविंद मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री तिडके सर यांनी केले ,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या