Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत शक्तीकुंज वसाहतीत अवतरली पंढरी...विद्यावर्धिनी विद्यालयाच्या बाल दिंडीने नागरीकांचे लक्ष वेधले..

परळी | प्रतिनिधी


  आषाढी एकादशीचे निमित्त साधून  विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शक्तीकुंज वसाहतीत बाल दिंडी काढली होती.विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत विठुनामाच्या गजरात वसाहतीतील रस्त्यावरुन पालखीसह बालदिंडीने नागरीकांचे लक्ष वेधले.


    विद्यावर्धीनी विद्यालयातील या बाल दिंडीचे प्रस्थान बुधवार दि.28 जुन रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.पालखीतील विठ्ठल प्रतिमेचे पूजन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.जीईटके,बालासाहेब महाराज फड,दीनदयाल नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, पत्रकार धनंजय आढाव,धीरज जंगले,माणिक कोकाटे,प्रा.राजु कोकलगावे सर,संस्थेचे सदस्य एस. बी.भिंगोरे,एम.टी.मुंडे,यांच्या हस्ते करण्यात आले.


सर्व पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मातेकर,सुमठाणे यांनी गुलाब पुष्प देऊन केले.विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत असलेल्या या बाल वारकऱ्यांनी नवीन शक्तीकुंज वसाहतीतील भक्तिगीते व विठ्ठलाचे अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केले.


यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी ठिकठिकाणी फेर धरून फुगड्या खेळल्या.अभंगाच्या तालावर टाळ,मृदंगाच्या गजरात पाऊल खेळून रिंगण खेळले.शेवटी शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा करत विठ्ठलाची आरती होऊन दिंडीचा समारोप झाला.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक,शिक्षीकांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या