Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | विठू नामाच्या गजराने दूमदूमला...पोदार शाळा परिसर...

 


आपला ई पेपर परळी 

पोदार लर्न स्कूल येथे आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यातील प्रत्येक चिमुकल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद टिपण्यासारखा होता खऱ्या वारीतील वारकऱ्याप्रमाणे सजलेले हे चिमुकले विद्यार्थी म्हणजे एक प्रकारचे अट्रॅक्शन होते.





































आषाढी एकादशीचे निमित्त साधून पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनीची बाल दिंडी आणि विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत विठुनामाच्या गजरात शाळा परिसरात पालखीसह बालदिंडी लक्षवेदक ठरली.

 

विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्यांच्या वेषभुषेत असलेल्या कु. ज्ञानदा ज्ञानेश्वर गुट्टे या बाल वारकरी विद्यार्थिनीने भक्तिगीते व विठ्ठलाचे अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केले. 

यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनींनी रिंगण धरून  फुगड्या खेळल्या.अभंगाच्या तालावर टाळ,मृदंगाच्या गजरात पाऊल खेळून रिंगण खेळले.शेवटी शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा करत विठ्ठलाची आरती होऊन दिंडीचा समारोप झाला. यावेळी अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, शाळेचे प्राचार्य मंगेश काशीद उपप्राचार्य लक्ष्मण पाटील 

हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक,शिक्षीकांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या