Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यअभियंता आव्हाड यांच्या वाढदिवस परळीत समाजउपयोगी कार्यक्रम

आपला पेपर

परळी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प दिपनगर भुसावळचे मुख्यअभियंता मोहन आव्हाड  यांच्या वाढदिवसानिमित्त दि12 जून 2023 विविध ठिकाणी  समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न झाले व मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड ह भ प युवा कीर्तनकार प्रकाश महाराज फड आळंदी देवाची, संग्राम बालासाहेब फड यांच्या वतीने करण्यात आला.


भुसावळ येथील दिपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थी यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली, परळी शहरात उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे खिचडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.तसेच रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी येथील विद्यार्थ्यांना  मृदंग 1, टाळ 10 वाटत तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

परळी उपजिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ.अरुण गुट्टे, डॉ. विजय ढवळे, ज्येष्ठ पत्रकार कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, ओमप्रकाश बुरांडे, ज्येष्ठ संपादक बालकिशन सोनी, जगदीश शिंदे, अनंत कुलकर्णी, संपादक आत्मलिंग शेटे, संपादक अभिमान मस्के,  संग्राम बालासाहेब फड निवृत्ती खाटीक, उपसरपंच रमेश फड ,विजय तिडके आदिची उपस्थित होती. श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी येथील संस्थेस टाळ 10,मृदंग 1,व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी ह भ प युवा कीर्तनकार जगदीश महाराज सोनवणे, मुक्ताराम मुळे, अजय मुंडे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या