यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
आपला ई पेपर परळी वैजनाथ
वंचित, उपेक्षित व शोषित यांना खऱ्या अर्थाने सन्माने जगायला शिकवणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण व इतर सुविधा उपलब्ध करुन दारिद्र्याच्या खाईत खिचपत पडलेल्या समाजाला प्रगतीची वाट दाखविली.यामुळे आज अनेक पिढ्या संपन्न झाल्या असल्याचे मत पत्रकार धनंजय आढाव यांनी व्यक्त केले.शाहु महाराजांची जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दिनांक 26 जुन हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे व दैनिक दिव्य मराठीचे परळी प्रतिनिधी पञकार धनंजय आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा.ए.डी.शेख,प्रा.यु.एन.फड, एस.बी. आष्टेकर ,व्ही.एन.शिंदे, एम.पी.सातपुते,यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.
Social Plugin