Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साजरी

आपला ई पेपर | परळी वैजनाथ 


            लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

           लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्रा.डॉ लक्ष्मण मुंडे आदी उपस्थित होते.

 यावेळी प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, प्राचार्या देशपांडे, प्रा. देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या