Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंताचा गुण गौरव...

 गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे शैलेश प्रेमनाथ वैजवाडे


परळी  प्रतिनिधी

१० वी व १२ वी चा निकाल लागला असून या मध्ये परळी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व त्यांच्या कर्तुत्वास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरातील गुणवंताचा गुण गौरव व करीअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास मराठवाड्याचे सुपुत्र, सुप्रसिध्द व्याख्याते तथा शिक्षण तज्ञ मा.श्री.महेश पाटील हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार समाजाचे बीड जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशदादा कानगावकर,तर प्रमुख पाहूणे म्हणून  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त मा.श्री.डॉ.तेजस माळवदकर, भावसार समाज परळीचे अध्यक्ष श्री.प्रभाकर हजारे व भावसार समाज महिला अध्यक्षा मा.सौ.प्रणिताताई हंबीरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणार्‍या संस्थांचा सन्मान व गरजू होतकरू महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहे.

हा गुणगौरव सोहळा शुक्रवार    30 जुन 2023 रोजी सायं.4;30 वा. श्रद्धा मंगल कार्यालय, पावर हाऊस समोर परळी वै. येथे होणार आहे.

तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भावसार युवा सेवाभावी संस्थेचे सचिव शैलेश प्रेमनाथ वैजवाडे यांनी केले आहे

*Breaking परळीत दुचाकी चोरीला गेली चोर CCTV फुटेज कैद*

*https://youtu.be/c4qsxfQj_ak*

*आपला ई पेपर_Online ब्रेकिंग न्यूज_माझा*

https://aplaepaper.blogspot.com

| Breaking | ब्रेकिंग न्यूज |

*Join the Whatsup*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या