Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत हद्दीच्या वादावरून राडा | तृतीयपंथीचे दोन गट भररस्त्यात भिडले... एक गंभीर जखमी

आपला ई पेपर 


          परळी तुम्ही येथे का आलात?असे म्हणून टोकवाडीच्या तीन तृतीयपंथी व अन्य चौघांनी अंबाजोगाईच्या पाच तृतीयपंथीना मारहाण केली.यात एका तृतीयपंथीय जखमी झालाअसून शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात घडली. 

परळीत शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते मोंढा मार्केट रस्त्यावर दर सोमवारी आठवडी बाजर भरतो. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजारात लोकांना पैस्यांची मदत मागण्यावरून टोकवाडी व अंबाजोगाई येथील तृतीयपंथीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली.यात पूर्वा दिव्या बक्स 23 ,रा.अंबाजोगाई या जखमी झाल्या.त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी दिव्या बक्स यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात टोकवाडीच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत


पिढीजात काम आहे...

परळी शहर हे पूर्वजांपासून आमच्याकडे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून अन्य तृतीयपंथी आम्ही परळीचे रहिवासी आहोत. आम्हीच बाजार मागणार, असे म्हणत इतर तृतीयपंथीयांना मज्जाव करत आहेत. सात पिढ्यांपासून आम्ही बाजारात मदत गोळा करतो. येथे आमचे घर आहे. परळीतील तृतीयपंथीयांनी इतर लोकांना सोबत घेत केलेल्या हल्ल्याचा निषेध करते. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा.

- अंजली पटेल, तृतीयपंथीयांचे गुरु, उदगीर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या