Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत स्व.सुवालालजी वाकेकर यांच्या स्मरणार्थ | 25 हजार वह्यांचे वाटप

 स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांची माहिती


आपला ई पेपर |परळी वैजनाथ 

        शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय भरीव काम करणारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने परळी शहर आणि परिसरातील गरीब, होतकरू व गरजवंत विद्यार्थ्यांना 25 हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर (ललवाणी) यांनी दिली.

       जवाहर शिक्षण संस्था, लिटल प्लावर एज्युकेशन सोसायटी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आदी नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव कामगिरी केलेले, परळी उपनगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष या पदावर काम वेगळी ओळख निर्माण केलेले, जैन श्रावक संघाच्या कार्यात नेहमी अग्रभागी राहिलेले आणि सर्वच क्षेत्रात कायम अढळ स्थान निर्माण केलेले स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या स्मृतिदिन असुन यानिमित्ताने स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहर आणि परिसरातील गरीब, होतकरू व गरजवंत विद्यार्थ्यांना 25 हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप केले जाणार असल्याचे स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर तसेच डॉ. प्रकाश वाकेकर, दिपक वाकेकर आणि वाकेकर परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

     स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गरीब विद्यार्थ्यांसाठी स्व. सुवालालजी वाकेकर काॅम्युटर इन्स्टिटय़ूट चालवली जाते तर सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी अभियान, रक्त तपासणी शिबीर, परळी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना मोफत भोजन आदी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करून शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले जाते.

समाधीस्थळी अभिवादन

        स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या मंगळवार दि. 27 जुन रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या परळी ते गंगाखेड रोडवर असलेल्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या