दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी पदाधिकारी नियुक्ती समारंभ साजरा...
परळी | प्रतिनिधी
शहरातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रशालेतील ५६ विद्यार्थांनी विविध २० पदांसाठी नामांकन दाखल केले होते, त्यासाठी गुरुवार दि. २२ जून २०२३ रोजी प्रशालेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत भरभरून मतदान केले.
सदर सर्व निवडून आलेल्या विद्यार्थांना पदाची नियुक्ती व शपथ समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई शहराचे पोलीस उपअधीक्षक मा.श्री.अनिल चोरमाळे सर हे लाभले त्याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी प्रशालेतील असलेल्या सर्व शिक्षकवर्ग व शैक्षणिक सुविधांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधुनिक काळात कसा फायदा करुन घ्यावा त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील महत्त्वाचा घटक असून योग्य शिक्षण व मेहनत हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले, नियुक्त करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेचे प्राचार्य मा.श्री.विठ्ठल तुपे व प्रशालेतील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरण गित्ते प्रशालेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब सचिव, नगरविकास सार्वजनिक बांधकाम उद्योग पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य श्री.विठ्ठल तुपे मार्गदर्शन केले.
Social Plugin