Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

युवकांचे प्रेरणास्थान |नव्या उमेदीने भव्य-दिव्य काम करण्याचा संकल्प | युवा नेते सचिन कागदे

 युवकांचे प्रेरणास्थान, सर्वसामान्यांचा आधारवड  अडचणीत धावून येणारे रिपाईचे युवा नेते सचिन कागदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परळी /अनिल गायकवाड

रिपाईचे युवा नेते सचिन कागदे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हितचिंतकासमवेत वाढदिवसांचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.


आपण सर्व माझ्यावर मनापासून प्रेम करता,आपल्या प्रेमामुळेच मी सामाजिक चळवळीत दोन पावले उत्साहाने टाकत असून भविष्यात नव्या उमेदीने यापेक्षाही अधिक भव्य-दिव्य काम करु असा संकल्प सचिन कागदे यांनी केला. 


दरम्यान, दिवसभर वाढदिवसांच्या शुभेच्छांचे आदान-प्रदान चालू होते. प्रत्यक्ष भेटून तसेच फोन, व्हॉटस्‌अप आदींवर तर शुभेच्छांचा वर्षावच चालू होता. 

परळी शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रणी नेतृत्व अशी ओळख असलेले युवकांचे प्रेरणास्थान, सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून सर्वांच्याच अडचणीत धावून येणारे रिपाईचे युवा नेते सचिन कागदे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.






शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना आदींच्या वतीने कार्यकर्त्यांच्या सोबत वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासूनच हितचिंतकांनी गर्दी केली होती. केक कापून व उपस्थितांचे तोंड गोड करुन सचिन कागदे यांनी वाढदिवस उत्साहात साजरा केला. विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त सचिन कागदे यांची भव्य रथातून मिरवणूकही काढण्यात आली. सवाद्य मिरवणूकीने उपस्थितांचे अभिवादन स्विकारत सचिन कागदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.