Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी | कार्यकर्त्यांचा जनसागर उसळणार....

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा 9 स्मृतिदिन  ३ जूनला अभिवादनासाठी राज्यभरातून येणार मुंडे प्रेमी


रामायणाचार्य ढोक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या दिव्यांग तपासणी शिबीर

परळी वैजनाथ  

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी लोकनेत्याच्या अभिवादनासाठी आमदार, खासदारांसह राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर याठिकाणी उसळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरू असून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. गतवर्षी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गडावर आले होते, त्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम पार पडला होता. 

  यावर्षी ३ जूनला गडावर दुपारी १ ते ३ वा. दरम्यान ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व आजी माजी आमदार, खासदार, मान्यवर नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 


उद्या दिव्यांगासाठी तपासणी शिबीर

----------------------------

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. कोरोना काळात सेवा यज्ञातून दिलेला मदतीचा हात,महाआरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत,आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत, सामुदायिक विवाह सोहळा आदी विविध उपक्रम राबवून सामाजिक उत्थानाचा वसा घेतला आहे. लोकनेत्याच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने आणि समाजकल्याण विभाग भारत सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने उद्या २ जून रोजी सकाळी १० ते सायं.६ वा. दरम्यान शहरातील उप जिल्हा रूग्णालयात दिव्यांगासाठी नोंदणी व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीराचा लाभ घेण्याचं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

दरम्यान ३ जून रोजी गोपीनाथ गडावर सर्व नागरिक तसेच  सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या